STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Others

3  

Dattatraygir Gosavi

Others

सर्व पित्र अमवस्या

सर्व पित्र अमवस्या

1 min
258

वाड वडीलं पुर्वजांना

इष्ट वरिष्ठ पितरांना

देऊ अक्षय उजाळा

प्रिय नाते संबंधांना।।धृ।।


सर्व पित्र अमवस्या

क्षमाशिल अमवस्या

देवा समक्ष उठ बस्या

आज आम्हा पामरांना।।१।।


यावे भेटी आबा आजी

पणजोबा नि पणजी

खापर गोंतावळाजी

आशिर्वाद लेकरांना।।२।।


मोह पान पत्रावळी

जल रस द्रोणावरी

तांदूळ धुप आगरी

नमस्कार गोतरांना।।३।।


लाडू कोन्होली करंजी

कढी तुप सारं भजी

वडी भात; वाढू भाजी

ब्रम्ह विष्णू महेशांना।।४।।


राम सीतामाई संसार

शिव पार्वती माई भरं

मीठ मिरची भाकरं

सुर्य चंद्र पितरांना।।५।।


Rate this content
Log in