STORYMIRROR

AnjalI Butley

Others

4  

AnjalI Butley

Others

सरते वर्ष

सरते वर्ष

1 min
621

महापूर, महाराजकारणावर

पडला पडदा सरता सरता वर्ष...


देशात् घडलेल्या जुन्याच विषयांच्या

नव्या बातम्या माध्यमात गाजल्या...


मुलीनेच प्रियकराबरोबरीने संगनमत करून

बापाचा खून करून, प्रेताचे तुकडे करून समुद्रात फेकले...


शिकल्या सवरलेल्या डॉक्टर मुलीवर

सामूहिक बलात्कार करून, पेट्रोल टाकून जाळले...


गुन्हा करणाऱ्यांचे वय काय, नातं काय

शिक्षण काय, नशा केली होती काय...


अनेक प्रश्न मनात घर करता

न्यायासाठी वर्दीतल्या माणसाकडे डोळे लागतात...


माणसाच्या 'माणुसकी'चा होणारा अंत 

हे काही न समजणारे एक कोडे होय...


सरता सरता वर्ष मनाला परत परत सांगत

भौतिक प्रगतीपेक्षा 'माणुसकी'च जपण्याचा मंत्र जप नव वर्षात!!!


Rate this content
Log in