सृष्टीरूप
सृष्टीरूप
1 min
349
रवीने ढगाआड चक्क दडी मारली
सृष्टीने धवल धुक्याची शाल पांघरली....
अवचीत पावसाच्या बरसल्या धारा
काही ठिकाणी तर पडल्या शुभ्र गारा....
गार वार्याने बाई तनूस हुडहुडी भरली
धुकं आणि पाऊस रोमान्स करू लागली....
ऐन हिवाळ्यात पावसाला उधाण आले
स्वेटरसह रेनकोट,छत्री माळ्यावरून काढले...
काय बाई!निसर्गाचे हे ॠतूचक्र गान
धरेवर नृत्य करतेय सृष्टीचे रूप महान...
