सृष्टी रूपं सखा
सृष्टी रूपं सखा
1 min
6
प्रभुच्या चरणी नमवीन काया
ऐसी प्रेममाया पांडुरंगा!!१!!
तूची ओतप्रोत भरलीसे सृष्टी
नसे ते अंगुष्टी सुटलेले!!२!!
जळी काष्टी पाषाणी तुच पांडुरंगा
मानवाचे रंगा कैसा नव्हे?!!३!!
मित्र सखा असे तूची माय बाप
सर्वं संत भक्त्त तूची असे!!४!!
संतदास म्हणे तुझ्याच चरणी
होईन मी लिन सृष्टी रूपा !!५!!
