कामिका एकादशी
कामिका एकादशी
उद्या बुधवार दि ३१जुलै कामिका एकादशी पुराणात फार महत्व सांगितले आहे की जी एकादशी करताच वाजपेयी यज्ञ करण्याचं सामर्थ्य मनुष्यास प्राप्त होऊन ब्रम्ह हत्ये सारखी महान पातके कामिका एकादशी केल्याने नष्ट होऊन मनुष्यास मुक्ती प्राप्त होते. ति व्रत कथा खालील अभंगातून सर्वा जिवाच्या उद्धारार्थ या ठिकाणी वाचन, मनन,किंवा कथन करून जीवास सर्वं पापा पासून मुक्ती मिळून युद्ध प्रसंगी ब्राम्हण,क्षत्रिय हे व्रत करून सामर्थ्य वाढवून घेत असतं असे या कामिका एकादशी व्रताचे कथा महात्म्य आहे.
(अभंग नं ११)
युधिष्ठिर पुसे महत्व कृष्णाशी
कामिका ते कैशी व्रत कथा!!१!!
कृष्ण युधिष्ठिरा सांगे तो कथेशी
ब्रम्हा नारदाशी कथीले जे!!२!!
ठाकूर क्षत्रिय हेकेखोर मोठा
तेणे केला तंटा ब्राम्हनाशी!!३!!
बोलिता वाढीले तेथेची भांडण
ब्राम्हणा मर्दन केले तेची!!४!!
ब्रम्हहत्या पाप ठाकुरा मस्तकी
शोधे तोची मुक्ती ऋषीं मुनी!!५!!
मुनीवर सांगे कामिका व्रताशी
आहे एकादशी वरिष्ठ ते !!६!!
आरंभीला यज्ञ धरी एकादशी
प्रिय तो विष्णुशी झाला तेणे!!७!!
ठाकूर झोपेशी जाता तेची क्षणी
मुक्ती मंत्र कांनी सांगे विष्णू!!८!!
संतदास म्हणे तरले ते अपार
सरे येरझार भवव्यथा !!०९!!
