पुत्रदा एकादशी
पुत्रदा एकादशी
पुत्रदा एकादशी व्रताचा महिमा
सांगे परमात्मा अर्जुनाशी !!१!!
धरा कलियुगी पुत्रदा एकादशी
जाई संतानेशी आपदा ते!!२!!
महिष्मती नगरीं वसे महिजीत
राज्य धर्मागत चालवी तो!!३!!
येता वृद्धावस्था खिन्न तोची मनी
राज्यवंशा धनी व्हावे कोणी?!!४!!
नाही संतान ते मज पोटी कोणी
आता प्रजाजनी सांभाळावे!!५!!
भेटे लोमशऋषीं धुंडीता ते वन
पूर्व जन्मी कथन करी राजा!!६!!
क्षुधा तृषे तूची राजा कष्टलाशी
मारिले गाईशी व्यताक्षणी !!७!!
तिच्या शापे तुज न मिळे संतान
त्याचे उच्चाटण पुत्रदा ते!!८!!
श्रावण शुक्ल पक्षी धरा एकादशी
तेणे आपदाशी टाळेल ती !!९!!
पुत्रदा एकादशी नाम ऋषिकेशी
गाता अहर्निशी पुत्र प्राप्ती!!१०!!
संतदास म्हणे पांडू पुत्र झाला
मनी आनंदला महिजीत !!११!!
