शांततेचा शाम व्हा रे...!!
शांततेचा शाम व्हा रे...!!
जीवनातल्या आठवणींना
उजाळा तुम्ही देत जां रे
स्पर्शा विना तेची खरे
प्रभू प्रेम ते घेत जां रे!!१!!
मानवतेचा मुखवटा तुम्ही
कलंकीत तो करू नका
सद्विचारांच्या वाटे तुम्ही
काटे काहीसे पेरू नका!!२!!
दोन प्रीतीतला चंद्र तुम्ही
शांत रात्री मध्ये पहा
रात किड्या सारखे तुम्ही
काजव्या सम चमकत रहा!!३!!
उन्हातान्हात सावली देण्या
शांततेचा वृक्ष व्हा रे
कृपावंता हस्त होऊनि
गरजवंता ढाल व्हा रे!!४!!
घर होता आले नाही जरी
झोपडीच्या ताट्या व्हा रे
शांत संयमी मानवतेचा
प्रेमरसी तो शाम व्हा रे!!५!!
