संत गजानन
संत गजानन
थळ गांवी जन्मं शेंगावी प्रगटले
संत हे आपुले गजानन !!१!!
तया चरणाशी माझा नमस्कार
गजानन थोर विभूती यां !!२!!
शाहूबाई माता पिता तो भवानी
साबळे घराणी क्षत्रियकुळी !!३!!
वासुदेव सांगे सद्गुरूं समर्थ
गजानन अर्थ जीवनाचे!!४!!
बालपणी ज्यांची विदेही ती वृत्ती
सोडावी आसक्ती आम्हां लागी!!५!!
ऐसे ते वचनं बोलले पित्याशी
उद्धार जगाशी करावया!!६!!
वडाचिया झाडां खाली प्रगटले
शिते वेचिले पत्रावळी!!७!!
जाऊनी भास्करा निजबोध केला
पानी लाविला शुष्क गर्दाळा!!८!!
संतदास म्हणे आले जगकल्याणा
शेंगावीचा राणा गजानन!!९!!
