रांगोळी सेवा
रांगोळी सेवा
1 min
5
देवा तुझ्या दारा रांगोळी हे माझी
कर तु रें राजी सेवा माझी!!१!!
अनंत जन्माचे सुखं हेची मज
चरणी हे राज करीन मि!!२!!
जाताची रांगोळी संत पाय देती
तेची सुखं राहती मनी माझ्या!!३!!
काही नको मज दुजे काही देऊ
चरणी ते ठेऊ तुझ्या सदा!!४!!
चरणाची सेवा हाची मज स्वर्ग
नं होई तो गर्व मज लागी!!५!!
संतदास म्हणे नित्य घडो सेवा
हेची मज देवा मागणे रें!!६!!
