प्रेमाच्या या गांवी
प्रेमाच्या या गांवी
1 min
5
मित्रा एकमेका कधीही
प्रेमच द्यावे प्रेमच घ्यावे
नित्य आपुल्या वाणीतून
स्नेहाणे ते अमृत द्यावे !!१!!
कुजलेल्या त्या विचारांनी
एकमेका कधी दुखवू नये
कोणाचाही अपमान होईल
असे कधीचं बोलू नये!!२!!
मान द्यावा मान घ्यावा
अपमान कोणा करू नये
उज्वल यशाच्या पायरीला
सन्मान देण्या विसरू नये!!३!!
गजबजलेल्या यां दुनियेत
कोण कोणाचा दुष्मन रें
आनंदाचे गीत गाता
मैत्र्य करावे सर्वांशी रें!!४!!
संतदास म्हणे प्रेमाच्या
या गांवी राहावे सदैव
दिल कोणाचे नं दुखवता
आठवणीत राहावे सदैव!!५!!
