STORYMIRROR

Purushottam hingankar श्री पुरुषोत्तम महाराज हिंगणकर

Others

3  

Purushottam hingankar श्री पुरुषोत्तम महाराज हिंगणकर

Others

पेरणी

पेरणी

1 min
4

आले अभाय भरून

गाणं गातसे कोकिळा

शेतकरी राजा तुई

जाऊ देरे तिफन माळा ||१||


गाणं म्हणतं म्हणत

बैलं चालती जोरातं

हेल्या बैलाचं औतं ते

राम्या वखराले जुपत ||२||


 काळ भोर ते अभाय

येता ढोल वाजवते

बसुराज्यां...च्या नादान

ईज आनंदी नाचते ||३||


बीज पेरता पेरता

राम गाणं तो म्हणते

ओटी पोटाले बांधून

सखुबाई उनारते ||४||


झाली हिरवी वनराई

मनी वसंत बहरला

माया विठूच्या मयानं 

शालू हिरवा पांघरला ||५||


झाला आनंदी आनंद

गगणात मावेनासा

गाती आनंदाने सारे

हर्ष झाला संतदासा ||६||


Rate this content
Log in