सरकारी व्यवस्थेचे रणांगण
सरकारी व्यवस्थेचे रणांगण
1 min
28.5K
व्यवस्थेचा साप डसला
सामान्य रणांगणात फसला.....
सामान्य माणसाला सदैव
यंत्रणेचा ताप आहे माथी
एकटाच फसला युद्धात
उरला नाही कोणी साथी.....
सरकारी कार्यालयाचे करून फेरे
डोकं झालं आता सुन्न, निकामी
पाय थरथरे, छातीत धडधडे
सर्व प्रयत्न निष्फळ, कुचकामी....
कोर्टाच्या फेऱ्या, रेशनच्या रांगा
सरकारी कार्यालयाच्या खेटा
होत नाही कोणतेही काम
म्हणतात, "तुम्ही वरिष्ठांना भेटा"....
त्याचीच शिजते येथे डाळ
जो देतो पैशांची मलाई
या व्यवस्थेच्या रणांगणात
सरकारची होते वरकमाई.....
व्यवस्थेचा साप डसला
सामान्य रणांगणात फसला.....
