सरीवर सरी
सरीवर सरी
1 min
186
साजन सजणी निघाले फिरायला
अवचित गार गार वारा सुटला
तनूवर मस्त शहारा बाई उठला
जीव हा निसर्गचत खूपच दंगला...
काळे काळे ढग गगनी हिंडू लागले
म्हातारी बाई हरभरे भरडू लागली
गडगडगड नाद घुमू लागला गगनी
साजन सजणी हाती हात घालून चालली...
तनूस लागे तनू सजणी जरा बावरली
सजना या मोसमचा आनंद घेतोय
सजनीसमवेत रोमॅन्टीक पण होतोय
पावसाळी वातावरण अनुभवतोय...
सरीवर सरी आल्या वसुधाला मिळाल्या
सजना अन सजणीला हर्ष झाला
त्यांनी तनुवर सरी झेलल्या मनसोक्त
प्रीतीचे क्षण वेचताना जीव आनंदला..
