सरीता
सरीता
1 min
198
बाहणे नाही वाहने सदा
खळखळत जाते
वाटेवरचे धोंडे, काटे
वाहत ती नेते...
स्वत:ची दिशा ठरवून
सतत प्रवाहीत असते
सगळ्यांची तहान भागवून
समुद्राला जाऊन मिळते....
उच्च निच्च भेदभाव
करत नाही कुणा
समद्यांना सारखी लेखत
जसे मायेसाठी तान्हा....
स्वच्छ ठेवा सतत तीला
घान नका करू
कंपन्यांचे विषारी पानी पिऊन
पशू प्राणी लागले मरू.....
सृष्टीला जीवन देते
तिचे उपकार माना
पाण्याचा वापर जपून करण्या
सांगू सगळ्या जना....
नदी नाले आटतात तेव्हा
जगणे मुश्किल होते
पायपीट करुन पाण्यासाठी
माणूस कोसो दूर जाते.....
