गावची सरपंच
गावची सरपंच
1 min
265
आमच्या गावची गरीब बाई
सरपंच म्हणून निवडून आली
संविधानामुळे आज ती
गावची प्रथम नागरिक झाली....
दुसऱ्याकडे काम करुन
घरची चूल पेटवली
मुलांना जेवण भरवून
स्वत: उपाशी झोपली.....
तिचा पहिले कोणीच
नव्हता गावचा वाली
हलाकिचं जिणं असून
संसार सुखात केली.....
केव्हाही पाहिलं तरी
हसू असायचं गाली
स्वच्छतेची मोहिम राबवून
स्वच्छ ठेवे रस्ता आणि गल्ली....
गाव विकासाची कामे
सतत ती करतच गेली
तिच्या कामाची दखल
शासनानी घेतली....
शिकून नव्हती तरी
वरच्या पदी गेली
ही सर्व किमया
बबासाहेबांमुळे झाली.....
