STORYMIRROR

Neeraj Atram

Others

4  

Neeraj Atram

Others

ऋण

ऋण

1 min
399

ऋण फेडूया भारतमातेचे

नतमस्तक होऊ तिच्या चरणी

तन मन धन अर्पण करू

देह जाण्याआधी सरणी


महापुरुषांनी जन्म घेतला

क्रांतीवीरांनी केली क्रांती

बलिदान दिले मातेसाठी

घेतली होती मशाल हाती


शूरवीरांची हीच धरती

इथे कुणाला नाही भीती

विज्ञानाने भारत देशात

केली इथेच सतत प्रगती


याच भूमित शेतकरी माझा

पिकवितो धान्य माणिक-मोती

रक्षण करण्या माय भूमिची

गोळी झेलितो सैनिक छाती


वनराई कशी आहे बहरुन

आनंद देई सर्व जनतेला

या भारतमातेच्या कुशीत

पामराला या जन्म मिळाला


इथे आहे सुख शांती

धन्य आहेत भारतीय स्वत:

सतत प्रेमाचा वर्षाव करते

अशी लाडकी भारतमाता


Rate this content
Log in