STORYMIRROR

Neeraj Atram

Others

3  

Neeraj Atram

Others

आई

आई

1 min
244

जन्म घेऊनीया आईच्या उदरी

मायेची ऊब आहे तीच्या पदराला

बाळाला शिकविते जगण्याची कला

जाऊ आपण तीच्या शरणाला...


लहानपणी शिक्षण दिले घडविले मला

लाडी गोडी करुन घास भरवला

प्राथमिक धडे शिकविले मुलाला

जाऊ आपण तीच्या शरणाला....


सतत मुखी असते आईचे नाव

आपल्यासाठी सोसते सतत घाव

क्षणोक्षणी दिसते आपल्या नयनाला

जाऊ आपण तीच्या शरणाला...


मुर्तीला पुजण्यापेक्षा पुजा आईला

सर्व ब्रम्हांडाचा दर्शन झाला

धावून येते पाजण्या दूध बाळाला

जाऊ आपण तीच्या शरणाला...


सत्याचा मार्ग आम्हा दाखविला

वेळोवेळी धावून येते रक्षणाला

सांगितले आम्हा माणूस बनण्याला

जाऊ आपण तीच्या शरणाला....


ध्यानी मनी एकच असूद्या ध्यास

आठवा आता तरी तीच्या घामाला

लहान्याची मोठी केली लेकराला

जाऊ आपण तीच्या शरणाला.....


Rate this content
Log in