चंद्रमा
चंद्रमा
1 min
536
पौर्णिमेचा चंद्र कसा, दिसतोया छान
आकाशात आहे जसा, झुमर लटकुन..
जाऊ चला फिरायला, आपण मिळून
बाग कशी शोभून दिसते, चंद्रप्रकाशानं...
पृथ्वीवर पडलं आहे, शितल चांदणं
मन मोहून जाते, चंद्राला पाहून...
रात्रीचा गारवा जसा, जातो अंगाला स्पर्शून
गुलाबी थंडीमध्ये, चंद्र दिसतो उजळून....
पृथ्वीचा उपग्रह, त्याला महत्वाचे स्थान
कुतूहल वाटते चंद्राच्या कला पाहून....
कवेत मावेल एवढा, घेता येईल का उचलून
डोक्यातल्या कल्पना, होतील का पूर्ण
