आस
आस
1 min
221
आस होती तीला भेटण्याची
किमया ही आहे निसर्गाची
अंधारात वाट
मी शोधत आहे
काळोखाच्या रात्री
चांदण्यांची साथ आहे
लूकलूकनारे तारे
वाट दावत आहे
रात्रीची गार हवा
स्पर्शून जात आहे
ती जवळ आल्याचा
भास होत आहे
माझ्या हृदयाचे दार
स्वागतास उभा आहे
ही पहाटेची थंडी
सांगून जात आहे
दवबिंदूत तीचे
प्रतिबिंब शोधत आहे
सजनीच्या मिलनाची
वाट बघत आहे
हर्षून आनंदाचे
गीत गात आहे
