कन्या भ्रूणहत्या
कन्या भ्रूणहत्या
बाहेर यायचा आहे मला, मायच्या पोटातून
बाबा तुझी, आहे मी गा, कन्या रतन....
धोकू नका तुम्ही आता, माझ्या येण्यान
स्पर्धेमध्ये उतरून मी गा, शिखर गाठीन
करू नका हत्या माझी, करा हो रक्षण....
तुम्हची मी करीन सेवा, रात्र जागून
संकटांना मागे सारून, पुढे जाईन
सोनेरी अक्षराने, इतिहास लिहिन......
माझ्याकडे पाहू नका, वाईट नजरेन
मुलगा मुलगी आहे हे गा, एक समान
जन्म घेऊन येऊ द्या, मला हो हक्कान....
राहू मिळून आपण सगळे, गुण्यागोविंदान
तेव्हा होईल आपल्या, जीवनाचे कल्याण
आई बहिन आत्या मावशी, मीच होईन......
त्रास कधी होणार नाही, माझ्या पासून
मुला सारखे सर्व कामे, धाडसानं करीन
सावित्रिची प्रेरणा घेऊन, समाज घडविन.....
स्त्रीयांमुळे अस्तित्व, आहे ना टिकून
जन्म कसे घेणार तुम्ही,आई विन
सर्व पुजतात स्त्रीला, देवी समान.....
