STORYMIRROR

Neeraj Atram

Others

4  

Neeraj Atram

Others

शपथ घेऊ सारे

शपथ घेऊ सारे

1 min
342

प्लास्टिकच्या सररास वापरामुळे

होत आहे पर्यावरणाची हानी

कित्येकांचा जीव घेतला

या प्लास्टिकच्या पिशव्यांनी......


घर सजून सारे आहेत

नकली प्लास्टिकच्या फुलांनी

मनमोहक दिसतात फुले

जेव्हा पडतात नयनी.....


छोट्या पासून मोठ्या वस्तूपर्यन्त

सार व्यापलय क्षेत्र प्लास्टीकनी

बाजरपेठा दिसतात कशा

समद्या प्लास्टीकनी भरूनी....


प्लास्टिकची विल्हेवाट लावतांना

खूप येत असतात अडचणी

सर्व मिळून बंद करूया आता

पिशव्या तयार करणाऱ्या कंपनी....


शपथ घेऊ आता सारे जन

प्लास्टिक वापरणार नाही कुणी

करुया आपण सर्व याची

काटेकोरपणे अमलबजावणी.....



Rate this content
Log in