सरी⛈️
सरी⛈️
1 min
10
सर सर सरी पावसाच्या आल्या
कडकडाट विजेचा झाला
आभाळ झाले मग काळेभोर
सुगंध मातीचा पसरला ओल्या ।
बीज अंकूर अंकुर
ओल्या मातीच्या कुशीत
हळूच डोकावून पाहे
हिरवेगार लुसलुशीत ।
पक्षांची किलबिल चहूकडे
राने झाली हिरवीगार
दवबिंदू हे चमकती मोत्यासमान
निसर्गाचे सुंदर चित्र हे केवढे।
