सरही
सरही
1 min
303
वाऱ्यावर वार
नजरेत धार
मूरढे कमाल
मोरंगी चाल
कोमल आवाज
संगीत मय ताल....
खळखळ हसू जणू
मखमली हलार
पाहे वळून
होई हृदयी वार
अशी ही लहरी
सरही स्वप्न परी
भेटे जाता
नदी किनारी
डोईवर घागर
हातात दोरी
पाहून मला
पापण्या चोरी
लाजरी मुलकाची
भाबड्या मनाची
लाखत शोभे
सखी या वेड्याची...
अशी ही लहरी
सरही माझी
स्वप्नच परी
