सर सर सरी पाऊस आला रे
सर सर सरी पाऊस आला रे


सर सर सरी पाऊस पडतोय रे
रिमझिम रिमझिम नाद करतोय रे ।।
काळे काळे ढग गगनात आले
गडगड ढग वाजायला लागले
वीजांचा नाच सुरू झालाय रे
सर सर सरी पाऊस पडतोय रे ।।१।।
उनाड वारा सू सू वाहतोय पानात
टपटप गारा पडतात अंगणात
टपोर्या शुभ्र गारा वेचूया चला रे
सर सर सरी पाऊस पडतोय रे ।।२ ।।
बिजलीचा चमचमाट देखणा दिसतो
मयूर तालात पिसारा छान फुलवतो
ढगांचा नाच आपण पाहूया चला रे
सर सर सरी पाऊस आला रे ।।३।।
पाऊस रानाला ओलेचिंब करतो
धरणीला हिरवा शालू हो नेसवतो
सजलेली धरती पाहूया चला रे
सर सर सरी पाऊस आला रे ।।४ ।।
पत्र्यावरती टिपरीचा नाद गुंजतो
कौलावरती ताशांचा आवाज होतो
पावसाचा सुरेल नाद ऐकुया चला रे
सर सर सरी पाऊस आला रे।।५ ।।
नील आसमंत काळ्या मेघांनी भरला
पावसाने मनवाला आनंद खूप जाहला
सार्यांची खुशी आपण पाहुया चला रे
सर सर सरी पाऊस आला रे ।।६।।