STORYMIRROR

मैथिली कुलकर्णी

Others

4  

मैथिली कुलकर्णी

Others

सप्तरंगी आयुष्य

सप्तरंगी आयुष्य

1 min
243

प्रयत्न करता समोर

यश ते दिसावे....

वीतभर अंतरावर

त्याने हुलकवावे ।।


ओशाळल्या मनाला

किती आवरावे ?

अपयश आले पदरी

कसे सावरावे ?


तडजोड जीवनाची

जिद्दीने जगावे....

परि अपयशात का

होरपळून निघावे?


इच्छाशक्तीस तरी

किती वाढवावे?

ध्येयाची वाट ती

चालून थकावे ।।


वाटे वेड्या मनाला

इंद्रधनुष्य व्हावे....

सप्तरंगी आयुष्य

एकदा तरी भोगावे ।।


Rate this content
Log in