स्पर्शशिखा..
स्पर्शशिखा..
मी पाहते वाट संध्याकिनारी जिथे सांडलेले सडे केशरी
गंधाळलेल्या क्षणांचे पसारे घेऊन येते निशा हासरी
आरक्त गालावरीचे हसूही अधरावरी का हळू ओघळे
तुझ्या आठवांच्या सरी घेउनीया येती कसे मेघ हे सावळे
तुझा भास होई मला का असा रे रेतीवरी शुभ्र या चालता
तनु मोहरे बावरे का जराशी तुझी स्पर्शशीखा मला स्पर्शिता
लाजून चंद्रमा का नभीचा डोकावितो गूढ मेघातुनी
सांगे जणु गूज माझ्या मनीचे तेजाळल्या चंद्रकिरणातुनी
दिशा दाटलेल्या उरी स्पंदने ही ,कशाला उठावी पुन्हा साजणा
वाटेवरी सांडलेल्या क्षणांच्या उरी साठल्या पाऊलांच्या खुणा
