STORYMIRROR

Sangeeta GodboleJoshi

Others

3  

Sangeeta GodboleJoshi

Others

स्पर्शशिखा

स्पर्शशिखा

1 min
555

मी पाहते वाट संध्याकिनारी जिथे सांडलेले सडे केशरी

गंधाळलेल्या क्षणांचे पसारे घेऊन येते निशा हासरी


आरक्त गालावरीचे हसूही अधरावरी का हळू ओघळे

तुझ्या आठवांच्या सरी घेउनीया येती कसे मेघ हे सावळे


तुझा भास होई मला का असा रे रेतीवरी शुभ्र या चालता

तनू मोहरे बावरे का जराशी तुझी स्पर्शशीखा मला स्पर्शिता


लाजून हा चंद्रमा का नभीचा डोकावितो गूढ मेघातुनी 

सांगे जणु गूज माझ्या मनीचे तेजाळल्या चंद्रकिरणांतुनी


दिशा दाटलेल्या उरी स्पंदने ही ,कशाला उठावी पुन्हा साजणा 

वाटेवरी सांडलेल्या क्षणांच्या ,उरी साठल्या पावलांच्या खुणा


Rate this content
Log in