STORYMIRROR

Pradnya Ghodke

Others

4  

Pradnya Ghodke

Others

स्पर्धेसाठी कविता क्रं.२ शीर्षक:- असे काहीसे

स्पर्धेसाठी कविता क्रं.२ शीर्षक:- असे काहीसे

1 min
236

शब्द माझे गुलाम झाले,

तुझे दिसणे असे काहीसे..

गझलेतून होते तुला गुंफणे,

असे गुंतणे माझे काहीसे...! १.


कोण.. संध्येतून वाहते गाणे,

तुझे भास असे काहीसे..

संपू नयेत भुयारी रस्ते,

तसे वाटले असे काहीसे... २.


सरतील कसे दिवस?

प्रश्न माझे असे काहीसे..

कसे बदलले रस्ते ?

निमित्त झाले तसे काहीसे...!३.


किती पचवायचे राहिले?

किती पचवले दु:ख तसे..!

चौफेर भिंती बंद दार,

एकांती भेटते दु:ख असे...! ४.


चुकवते वाटा, बदलते रस्ते,

चकव्यात फसवते दु:ख कसे..?

खुशालीचे सांगावे,खोटे बोलावे,

लबाड बनवते दु:खं असे...! ५.


Rate this content
Log in