स्पर्धेसाठी कविता क्रं.१८) शीर्षक:- सारे दैवगतीचे फेरे...!
स्पर्धेसाठी कविता क्रं.१८) शीर्षक:- सारे दैवगतीचे फेरे...!
1 min
191
बाल्य,कोमल,कुसुमांचे,
अजूनी आठव येऊनी..
तुझी आठवण येता मग,
जाई स्मृती-पटल झरूनी... १.
गोड आठव मज दिलासे,
ते माझ्या वतीने होते..
अबोल्यांत हळवातूनी,
मुग्ध प्रेमगीत वाहते...! २.
पळामागूनी पळ सरकती,
काळ जसा जाई पुढे..
माग सुटेना अजूनही,
असे त्याचे अजब कोडे...! ३.
कधी नक्षत्रांतूनी भास!
कधी गंधारती फुले..
शुन्य रिक्ततेतही येथे,
वाटे पुरती जगले...! ४.
कोण! असावे इथे संतृप्तात?
नको सांगणे उगाच काही..
'सारे दैवगतीचे फेरे',
असेच झाले माझे...ही...!! ५.