स्पर्धेसाठी कविता क्रं.१७) शीर्षक:- मी प्रीतवेडी राधा...!
स्पर्धेसाठी कविता क्रं.१७) शीर्षक:- मी प्रीतवेडी राधा...!




हसण्याचा जोर उसळता,
उमाळा त्यात मिसळला..
गहिवरल्या त्या असोशित,
होता प्राण थरथरला...! १.
मौनात अर्थ भारला,
क्षणात तू...ओळखला..!
चुकवून डोळा तेव्हा,
प्रलय खास लपविला... २.
...ना प्रेम राहिले गुप्त,
चर्येत लपवुनी खुणा..
बेलगाम अश्रूधारा,
आल्या भरूनी पुन्हा...!
आत्मा न आवरे बांध,
आवरू कशी मनाला..?
मी प्रीतवेडी राधा,
तू कान्हा मुरलीवाला...
तू कान्हा मुरलीवाला....! ४