स्पायडरमॅन
स्पायडरमॅन
1 min
384
टीव्हीमध्ये पाहीला
एक स्पायडर मॅन
झालो मी त्याचा
गड्या साॅलीड फॅन
काय त्याचा पोशाख
आणि काय ती अदा
करामत नि हिंमतीवर
झालो त्याच्या फिदा
स्वप्नातही येतो रोज
स्टंट करतो भारी
कशाही नि कुठेही
सहज उड्या मारी
स्पायडरमॅन माझा
आवडता हिरो
ताकदीपुढे त्याच्या
शत्रू होई झिरो
घालूनी पोशाख वाटे
स्पायडर मॅन व्हावे
शक्तीचे वरदान देवा
मला ही तुम्ही द्यावे!!!
