Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

सोपा/कठीण

सोपा/कठीण

1 min
166


जीवनाचा पेपर असतो

काही जणांना सोपा

तर काहींना असतो

अवघड असे का?


हसतखेळत जीवन 

सुरळीत चालू असते

सुहास्य मुखावरील

त्यांच्या कधी न ढळते


काहींचे जीवन खडतर

वैतागती जीवनाला

प्रश्न सुटती ना सत्वर

का रे असे वाट्याला?


नीट पहाता दिसते

हास्यामागे दुःख असते

दडवूनी दुःख चेह-यामागे

सदैव मुख आनंदी असते


दुःख स्वतःचे मागे सारुनी

दुस-यांसाठी धावाधाव

निःस्वार्थीपणे काम करुनी

नसे कशाचीच ह्यांना हाव


रडतराऊंचे प्रश्न जीवनी

कधीच नच सुटणारे

नशिबाला दोष देणारे

प्रयत्न कधी न करणारे


सकारात्मक होऊ सारे

दुःख निराशा सोडून देऊ

संकटामधे धावून जाऊ

एकमेकां सहाय्य करु


Rate this content
Log in