सोनचाफा
सोनचाफा
1 min
980
सोनचाफा
सुगंधित
निसर्गाशी
संबंधित
वाढला तो
अंगणात
पसरला
परसात
येता जाता
त्याचा गंध
वाढवतो
अनुबंध
हिरवाई
ती देठांची
शोभा वाढे
त्या केसांची
प्रसन्नता
मज वाटे
दरवळ
मनी दाटे
वेणीतला
चाफा बोले
अखंडित
तन डोले
हाती येता
भाव जागे
देवास हे
देणं लागे
वाटसरू
होती दंग
सोनचाफा
ज्याचे संग
