सोळा एप्रिल(16)
सोळा एप्रिल(16)
1 min
122
दू रवर तो निशब्द
स र्व न्याहाळत
रा त्रीस साद घालण्यास्तव
दि वस संपवण्याची घाई करत होता..
व रकरणी आपलेपणा
स हज राखण्यासाठी
ल यीच सौम्यपणाचा आव
या री राखण्यास दावत होता....
स रसकट सारेच जात्यात
जा तात त्यात नवल ते काय...?
ता व मिशिवर मारतअसला तरी
ना टकच ते दुसरं तरी काय...?
कोण काय म्हणतो
कोण काय करतो
सार सार गौण आहे
जणू आपलं मौन आहे....
सांजेला मात्र
संकल्प पुन्हा तोच करायचा
घरात राहूनच त्या व्याधीची माज
मात्र नक्की जिरवायचा......!
