सोडू नको मला
सोडू नको मला
1 min
380
सोडू नको मला
ग माय माऊली
तुझाच श्वास मी
तुझीच सावली।
तमा नसे मला
कुणी न सोबती
तुझेच श्वास ते
ह्रदयात अंतरी।
कशास ग तुला
भिती संगती
मला सांग ना?
का?या विसंगति ।
जीव हा अभागी
आसुसला तव भेटी
नकोशी मी जरी
तुझीच सावली ।
आर्जव ग तुला
माय-माऊली
तोडू नको ही नाळ
घे मला पदरी।
