सोबत आईची...
सोबत आईची...
1 min
184
सोबतीने केला होता
एक प्रवास आपण
किती सांगू खास आई
माझ्यासाठी तो क्षण
तुझ्यासवे मिरवत
ह्रदयाचा वाढे मण
सोबतीचा तुझ्या होते
वेचत मी कण नि कण
अलगद झेललसं
माझं अवेळी रूसणं
राग पळून जायचा
तुझं पाहून हसणं
तुझ्यामुळे जमलं या
मुग्ध फुलाला खूलणं
सोबतीने तुझ्या आई
सुखकर हे जगणं
