संयम धरावा (सहाक्षरी)
संयम धरावा (सहाक्षरी)
1 min
12.3K
दिन एकवीस
संपलेल तरी
संयम धरावा
रहावेच घरी
धोका ना टळला
हीच सुरवात
काळजी सर्वांनी
ठेवा दूराव्यात
रेड झोन तुम्ही
वाढवू नकाच
ग्रीन झोन तोही
तुम्ही वाढवाच
कोरोना थांबण्या
साखळी तोडू या
महामरीवर
जय मिळवू या
जिंकेल भारत
हरेल करोना
चला काही काळ
धीर तो धरा ना