संवेदना
संवेदना
मी आणि माझे अस्तित्व होते
मर्यादित घरापुरते फक्त माझ्या
ज्ञानदीप लावते मी मुलांच्या मनी
संवेदना जपते सख्या मनातल्या तुझ्या...
जबाबदार्या पेलत राहतेच कुटुंबाच्या
त्यात कोणताही कसूर करत नाही
अध्यापनात नित्य नवे असते माझ्या
मुलांना संस्कार देण्याचे सतत पाही...
घर संसार फुलला आता माझा हो
संसारवेलीवर तीन मुलांचे घोस लागले
मुलांना सांभाळणे,शाळेत ज्ञानदीप लावणे
या सर्व कार्यात मी स्वतःला मात्र झोकून दिले...
आता पन्नाशी सरली निम्मे जीवन सरले
आता मात्र नव्या उमेदीचे पंखमला फुटले
सुरेख कविता करण्यात मी रमू लागले...
मिळतोय सन्मान माझ्या कवितांना
इतक्या दिवस घर नी शाळा करणारी
मी माझे अस्तित्व उदयास आणून मीच
स्वप्नांच्या हिंदोळ्यावर मी झुलणारी...
आनंद होतोय मनी खास माझ्या हो
अस्तित्व दिसायला लागलेय जनात
नयनात आनंदाश्रू साठतात ओघळणारे
राज्य करायला लागलेय आताशा जनांच्या मनात...
