संवाद..!
संवाद..!


कुणाशी संवाद साधताना
नेमकं बोलावं तरी कसं???
कोणाशी कोण बोलतंय,
लक्ष ठेवून असतात माणसं..!
कोणाच्या संवादात असतात,
बढाया नि फुशारकी..
काही जण तर काढतात,
सल मनातली बेरकी...!
काही छान साधतात संवाद,
ऐकत रहावे असेच बोलतात...
विचार त्यांचे ऐकताना,
कान कृतकृत्य होतात....!
कोणाला आवडतं संवादात,
सुखदुःखं इतरांना सांगायला...
तर काहींना उत्तम जमतं,
गुपितं पोटात ठेवायला....!
काहींना असते संवादात,
कामापुरते बोलण्याची घाई...
काहीजण आणतात कंटाळा,
वाटतं, नको गं बाई...!
वेगवेगळे होतात संवाद,
पण होत नाही संभाषण..
एकसुरी बोलत राहतात ,
करतात नुसतेच भाषण...!
मी मात्र नेहमीच ऐकतो,
बसतो करुन मन शांत..
मला हवा असतो सदोदीत,
प्रशांत वातावरणातील एकांत..!