संवाद
संवाद
जुळून येतील नाती घडणार सदैव भेटी-
संवाद साधला तर ...
मिटतील आपसातील
भांडण, घडणार नाही कुठेही वाद
-संवाद साधला तर...
कळून येतील मन
बहरून येईल संसार -
संवाद साधला तर ...
थांबणार नाही विकासाची गती,
होणार फक्त प्रगती-
संवाद साधला तर ...
मिळणार संधी मिळेल यश ही -
संवाद साधला तर...
उलगडा होणार काही गोष्टी,
समजून येतील काही रहस्य
ओठांवर येईल अलगत हास्य- संवाद साधला तर ....
वाढेल आत्मविश्वास,
परिस्थिती कुठली असो
जगता येईल निश्वास-
संवाद साधला तर
व्यक्त होतांना होईल मन मोकळं
घेण्याबरोबर देण्यातही मिळेल आनंद - संवाद साधला तर
मिळेल नेहमी प्रोत्साहान,
परिवर्तन दिसून येईल जगण्यात-
संवाद साधला तर ...
निराशा,अपयश पळेल दूर
मिळेल समाधान, नवचैतन्य
- संवाद साधला तर
भक्कम होईल नात्यातील पाया
जपली जाईल निस्वार्थपणे नाती
आपलेपणा, प्रेम यात
होईल अधिक वृद्धी-
संवाद साधला तर...😊
संवाद साधता.. संपतात वाद
निस्वार्थ नाते जपणे
म्हणजे खरा विश्वास
मन मोकळे बोलणे
थोडक्यात समजणे
थोडक्यात समजावणे
मुद्देसूद बोलणे
म्हणजे खरा संवाद
कामाच्या व्यापातून
थोडा वेळ काढून
आपुलकीच्या व्यक्तीसोबत
साधावा संवाद...🙏😊
