संत मुक्ताबाई
संत मुक्ताबाई
1 min
140
ज्ञानाची भगिनी | धाकटी मुक्ताई ||
भावंडांची आई | म्हणतसे ||
साक्षात दिव्यत्व | अर्पिले जगाला ||
भोगही सोसला | भावंडांनी ||
निर्दयी समाज | शिक्षाच देहान्त ||
मायबापा अंत | झाला असे ||
जग उध्दाराचे | कार्यच घडले ||
मानव नहाले | अध्यात्मात ||
मांडेच खाण्याची |इच्छा ज्ञाना झाली ||
पाठ तापवली | मांड्यांसाठी ||
गोरक्षनाथांचा | वर्षाव कृपेचा ||
क्षण आनंदाचा | मुक्ताईचा ||
रचले अभंग |ज्ञानाच्या साथीने ||
भगिनी मुक्ताने | आवडीने ||
अलौकीक कार्य | समाजात केले ||
लेखनही झाले | ज्ञानबोध ||
