संस्कृतीची जोपासना
संस्कृतीची जोपासना
1 min
402
सण आला प्रकाशाचा
स्वच्छतेचा, एकोप्याचा
जिव्हाळाचा, शृंगाराचा
आनंदाचा, उल्हासाचा ||१||
मानवाने, हृदयात
क्षण जपावे प्रेमळ
एकमेका देवू हात
ठेवू जीवन निर्मळ ||२||
घरोघरी सुरू झाली
फराळाची रेलचेल
करू सहाय्य गरिबा
थांबवूया घालमेल ||३||
निसर्गाचे संवर्धन
करू प्रत्येकाने खास
प्रदूषण मुक्त सण
देई जगण्याची आस ||४||
नाते टिकवून खरे
संस्कृतीची जोपासना
करू मनोभावे सारे
एक प्रेमाची कामना ||५||