संस्कृतीचा पावन संगम
संस्कृतीचा पावन संगम
1 min
238
नसे तोड कशास हिची
ही आहे सगळ्यात वेगळी
गोड आहे हिची वाणी म्हणून
प्रेमात आहेत तिच्या मंडळी सगळी
इतिहास हिचा आहे
खूपच अद्भुत आणि जुना
तरी ना पुसल्या जातात
हिच्या शौर्याच्या खुणा
कडीकपरातुनी वाहते
अनेक बोलीभाषांचे रूप घेते
घेऊन संस्कृतिचा पावन संगम
ही अविरत टिकते
उमटवला आहे तिने
जनमानसांत आपला ठसा
जपायचा तिला घेऊ
आपण सगळे मिळून वसा
