संस्कृती
संस्कृती
1 min
258
थोर बघा किती आहे
आमची ही संस्कृती
वाजवत डंका यशाचा
पसरली तिची महती
शिकवते आम्हाला ती
जपण्यास प्रेम नाती
विसरून सारे भेद भाव
आणि आपल्या जाती
समोरच्या माणसाला
आपले म्हणून पाहती
सदैव स्मरणात आमच्या
साधू संतांची शिकवण राहती
प्रेम करणे शिकवते सर्वा
आमची ही महान संस्कृती
पण वाटतो खेद कधी कधी
पाहून समाजातील विकृती
