संस्कार
संस्कार
जन्मापासून दिलीस आई
तूच ही संस्कारांची शिदोरी
तरलेय आजवर मी सुखात
टिकूनी ही आयुष्याची दोरी
बालपणापासूनी होती तुझी
सद्विचारांची मला शिकवण
भरकटले कधी जीवन माझे
झाली आई तुझीच आठवण
यशोशिखरावर चढताना मज
बांधलेय गं त्या रेशमीधाग्याने
उपदेशाचे तुझे डोस पाजताना
चिडायचे ओरडायचे त्राग्याने
कळतेय मला त्याचीच महती
मला तुझ्याच गं सुसंस्कारांची
शिकवीन माझ्या लेकरांना मी
पुरवुनी भावना या सदाचाराची
तुझ्या कसोटीला उतरलेय मी
सांग होऊ कशी गं मी उतराई
भाग्यवान आहे मी या जन्मात
मिळालीय तुजसम मला आई
