संसार
संसार
1 min
215
असावा सुंदर
संसार हा गोड,
मनामध्ये ओढ
दोघांच्याही//१//
विश्वासू धाग्याने
गुंफुनिया जोडी,
संसाराची माडी
उभारावी//२//
संकटाचा कणा
टाकावा मोडूनी,
मिळून दोघांनी
साथ देत//३//
नसावे मनात
संशयाचे भूत,
करेल ते घात
संसाराचा//४//
देऊनी आधार
उधळावे रंग,
जीवनात दंग
होऊनिया//५//
आई बाप स्थान
हृदयी असावे
कुटुंब हसावे
आनंदाने//६//
असावा आदर
दोघांच्या मनात,
फुलेल जगात
संसार हा//७//
