संसार माझ्या आवडीचा
संसार माझ्या आवडीचा
स्वयंपाकाशी माझी जमली गट्टी
मसाल्याच्या डब्ब्याशी माझी नेहमीच बट्टी
चहासाठी नेहमी जवळचा साखरेचा डब्बा
खाऊच्या डब्यातील खाऊ बरोबर हवा
आजीने दिले पोळपाट
आत्याने दिले वाटी आणि ताट
मावशीने दिलेला चांदीचा तांब्या पेला
त्याला पाहून स्टीलच्या वाटीचा तोराच गेला
रोजच्या वापरातले चमचे आणि डाव
कामाच्या वेळी खातात नेहमीच भाव
तळणीसाठी खास स्टीलचा झारा
म्हणतो माझ्या बाजूचा पसारा आवरा
फ्रिजचं आहे किचनमध्ये वेगळाच स्थान
त्याचा कार्य आहे खूपच महान
सगळ्या पदार्थाना ठेवतो थंड गार
गर्मीचा करतो हलका भार
कुकरची आहे वेगळीच मज्जा
शिट्या मारतो जसा हाच किचनचा राजा
कढई म्हणजे पुऱ्यांचा स्वीमिंग पूल
मिरावते अशी जशी फारच कूल
हे सर्व माझे सखे सोबती
रोज माझ्या मदतीला येती
