संपत्ती
संपत्ती

1 min

11.9K
वारसा जपूया पुस्तकांचा
हीच संपत्ती आपली खरी
संग्रह करून साहित्याचा
सुपूर्त करू पुढच्या पिढीवरी
ज्ञानाचा भांडार उत्तम हा
वाचनाने सिद्धत्वास जातो
ग्रहण मनन चिंतन हेचि
मार्ग मनुष्य जोपासतो
पुस्तकासमोर महामुनीही
नतमस्तक सदा झालाय
अहंकार शमलाय साऱ्याचा
सत्य निदर्शनास आलेय