STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

5  

Deepa Vankudre

Others

सण पहिला (लावणी)

सण पहिला (लावणी)

1 min
404

वाण संक्रातीचं, दान सौभाग्याचं, द्या कारभारी,

घ्या नाकात नथ, डोरलं खट अन् पैठणी भारी||धृ||


सोळा शिणगार करून, आले मी तुमच्या जवळ, 

पदर रेशमी खांद्यावरचा, पाडतोय तुम्हाला भुरळ,

नका लावू येळ, वाट पहात, दिन रात उभी मी दारी,

घ्या नाकात नथ, डोरलं खट अन् पैठणी भारी||१||


लाडू तिळाचा बनवला जरा चाखून बघा की राया, 

केला बेत हा सारा, लई साजरा, जाईल की वाया,

देते चांदीच्या वाटीत हलवा, त्याची चव हो न्यारी,

घ्या नाकात नथ, डोरलं खट अन् पैठणी भारी||२||


नव्या वर्षाचा सण पहिला, हौस माझी पुरी करा,

कंठी हार सजवा, गोऱ्या हाती हिरवा चुडा भरा,

ऐट तुमची बी किती, शोभतोय फेटा जरतारी,

घ्या नाकात नथ, डोरलं खट अन् पैठणी भारी ||३||


Rate this content
Log in