सण होळीचा....#रंगबरसे
सण होळीचा....#रंगबरसे
1 min
254
आली, आली गं फाल्गुन पुनव
रंग उधळत आला शिमगोत्सव सण
कुहू कुहू गात झाले ऋतूराज वसंताचे आगमन
करी स्वागत सारे झाडे, वेली नटून
सणाला या सकल हिरवेगार रान
होळी आली नवरंगाची करीत उधळण
सुख,समाधान, आनंदाचा हा क्षण
इंद्रधनू जणू पसरले सप्तरंगात न्हाऊन
साज रंगला सारा धरणीमाईचा
पीत रंग आहे आपुलकी, बंधाचा
लाल तो नवचैतन्य अन उत्साहाचा
हरित देखणा सृजन नवनिर्मितीचा
मुक्त भरारी घेई तो निळा सावळ्या कान्हाचा
वाढवी प्रेम, आपुलकी रंग जिव्हाळ्याचा
श्वेत रंग आहे तो शांततेचा
ल्यायला विविधरंगी हा सण होळीचा..
